राष्ट्रवादीचे उदयनराजे अडचणीत

पुणे – राष्ट्रवादीचे सातारा मतदारसंघातील खासदार उदयनराजे भोसले पुन्हा एकदा वादाच्या भोवर्‍यात सापडले आहेत. सातारा पोलिस सुपरिटेंडनी गृहमंत्रालयाकडे उदयनराजे यांची सुरक्षा काढून घ्यावी अशी शिफारस केली असल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार उदयनराजे यांच्यासाठी एक सरकारी सुरक्षा रक्षक दिला गेला आहे. उदयन राजे यांनी या रक्षकाचे रिव्हॉल्व्हर घेऊन दबंग स्टाईलने स्वतःचे फोटो सेशन केले आणि हे फोटो फेसबुकवर अपलोड केले. यामुळे एकच वादंग निर्माण झाले आहे. पोलिसांच्या प्रतिमेला यामुळे तडा गेला असल्याचे पोलिस अधिकार्‍याचे म्हणणे आहे. ज्या गार्डने रिव्हॉल्व्हर दिले त्याला दोषी ठरवून त्याची दोन इनक्रिमेंटस रद्द केली गेली आहेतच मात्र असा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून सातारा पोलिस सुपरिटेंडेंट नी उदयन राजे यांची सुरक्षा काढून घेतली जावी अशी शिफारस गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्याकडे केली आहे. संपूर्ण प्रकरणाचा अहवालही गृहमंत्रालयाकडे पाठविला गेला आहे.

उदयन राजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे १७ वे वंशज आहेत.तसेच ते माजी महसूल मंत्रीही आहेत.

Leave a Comment