इस्तंबूल: तुर्कस्तानातील धार्मिक नेता अदनान ओक्ततर याला महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी स्थानिक न्यायालयाने तब्बल ८ हजार ६५८ वर्ष कैदेची शिक्षा सुनावली आहे.
तुर्की धार्मिक नेत्याला साडेआठ हजार वर्ष कैदेची शिक्षा
अदनान हा तुर्कस्तानात दूरचित्रवाणीवर एक कार्यक्रम सादर करतो. त्याद्वारे तो आपले विचार दर्शकांपर्यंत पोहचवितो. या कार्यक्रमात त्याच्याबरोबर अनेक महिलांचा सहभाग असतो. या महिला भडक मेक अप करतात आणि तोकडे कपडे परिधान करतात. या महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप अदनान याच्यावर आहे.
मागील वर्षीही त्याच्यावर अनेक महिला आणि अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप ठेऊन अदनान याला न्यायालयाने १ हजार ७५ वर्ष कैदेची शिक्षा सुनावली होती. राजकीय आणि सैन्यदलात हेरगिरी केल्याचे आरोपही त्याच्यावर आहेत.
अदनान स्वत: ला धार्मिक नेता म्हणवत असला तरी त्याचे राहणीमान अतिशय विलासी आहे. तो अनेकदा शानदार मेजवान्या आयोजित करतो. या मेजवान्यामध्ये जगभरातील नामांकित व्यक्तींना आमंत्रित केले जाते.
