
दश्मिक/तेहरान – सीरियातील दश्मिकजवळ लष्कराच्या बसवर झालेल्या बॉम्ब हल्ल्यात किमान 18 सैनिक ठार झाले आहेत. या हल्ल्यात 27 जण जखमी झाले आहेत. दुसरीकडे, संसदेच्या मतदानापूर्वी इराकच्या रॉकेट हल्ल्यात 10 जण जखमी झाल्याची माहिती आहे.
दश्मिकमध्ये लष्कराच्या बसवर हल्ला, 18 सैनिक ठार; इराकमध्ये रॉकेट हल्ल्यात 10 जखमी
याआधी मार्चमध्ये मध्य सीरियातील पालमायरा येथे दहशतवाद्यांनी लष्कराच्या बसवर हल्ला केला होता, ज्यात 13 सैनिक ठार झाले होते. यादरम्यान अन्य 18 जण जखमी झाले. सीरियन प्रशासनाने यापूर्वी अशा हल्ल्यांसाठी दक्षिण आणि मध्य सीरियात कार्यरत असलेल्या इस्लामिक स्टेटला जबाबदार धरले आहे.
