वेस्टर्न ऑस्ट्रेलियाने भारताचा केला 36 धावांनी पराभव, केएल राहुल वगळता सर्व फलंदाज अपयशी


पर्थ – भारतीय संघ टी-20 वर्ल्डकपच्या तयारीला अंतिम रूप देण्यात व्यस्त आहे. या भागात भारत वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामना खेळत आहे. पहिला सराव सामना जिंकणाऱ्या भारतीय संघाला दुसऱ्या सराव सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाने भारताचा 36 धावांनी पराभव केला.

प्रथम फलंदाजी करताना वेस्टर्न ऑस्ट्रेलियाने नऊ गड्यांच्या मोबदल्यात 168 धावा केल्या. भारतासमोर 169 धावांचे लक्ष्य होते. प्रत्युत्तरात भारतीय संघ केवळ 132 धावा करू शकला. लोकेश राहुल वगळता भारताचे सर्व फलंदाज अपयशी ठरले. राहुलने 55 चेंडूत 74 धावांची खेळी खेळली.

भारताकडून ऋषभ पंत 11 चेंडूत 9 धावा काढून बाद झाला. त्याचवेळी दीपक हुडाने नऊ चेंडूत सहा धावा केल्या. हार्दिक पांड्याने नऊ चेंडूत 17 धावा केल्या. अक्षर पटेलने सात चेंडूंत दोन धावा केल्या. 14 चेंडूत 10 धावा करून दिनेश कार्तिक बाद झाला. हर्षल पटेलनेही 10 चेंडूत दोन धावा केल्या. अश्विन चार चेंडूत दोन धावा करून बाद झाला.

भारताकडून रविचंद्रन अश्विनने एका ओव्हरमध्ये तीन विकेट घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवर अश्विनची कामगिरी भारतासाठी चांगली बातमी आहे. त्याने चार षटकांत 32 धावा देत तीन बळी घेतले. कर्णधार राहुलने एकूण सात गोलंदाज आजमावले. अर्शदीपने तीन षटकात 25 धावा देत एक विकेट घेतली. भुवनेश्वरने दोन षटकांत 15 धावा दिल्या, पण एकही विकेट घेऊ शकला नाही. हार्दिकने दोन षटकात 17 धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही. दीपक हुडा महागात पडले. त्याने दोन षटकांत 22 धावा दिल्या. हर्षल पटेलने चार षटकांत 32 धावा देत दोन बळी घेतले. त्याचवेळी अक्षर पटेलने तीन षटकात 22 धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही.

विराट, सूर्यकुमार आणि चहल यांना दुसऱ्या सराव सामन्यात देण्यात आली विश्रांती
विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि चुजवेंद्र चहल यांना दुसऱ्या सराव सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे. हे खेळाडू ओपनिंग प्लेइंग 11 मध्ये नाहीत. मात्र, सामन्यादरम्यान कर्णधार राहुल या खेळाडूंकडून फलंदाजी किंवा गोलंदाजीही करून घेऊ शकतो.

भारतीय संघ: रोहित शर्मा, केएल राहुल (कर्णधार), दीपक हुडा, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (डब्ल्यूके), अक्षर पटेल, हर्षल पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग.

सूर्यकुमार यादव, विराट कोहली, युझवेंद्र चहल.

वेस्टर्न ऑस्ट्रेलियाची चांगली सुरुवात
दुसऱ्या सराव सामन्यात वेस्टर्न ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना दमदार सुरुवात केली. पॉवरप्लेमध्ये एका विकेटच्या मोबदल्यात 54 धावा केल्या. मात्र, पुढच्या चार षटकांत भारतीय गोलंदाजांनी धावगतीवर लगाम घातला आणि 10 षटकांनंतर पश्चिम ऑस्ट्रेलियाची एक बाद 78 अशी अवस्था झाली. पुढच्या पाच षटकांत वेस्टर्न ऑस्ट्रेलियाने 49 धावा जोडल्या, पण भारतीय गोलंदाजांना दोन विकेट घेण्यात यश आले. यानंतर अश्विनने एका षटकात तीन विकेट घेतल्या आणि धावसंख्या सहा बाद 137 अशी झाली होती. अखेरीस वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघ 168 धावा करू शकला.