राज ठाकरेंच्या सभेबाबात अजूनही संभ्रमच

पुणे- मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या रविवरी पुणे येथे होणा-या सभेची तयारी जोमाने सुरु आहे. तर गेल्याक आठ दिवसांपसून सुरू असलेल्याा सभेच्या ठिकाणाचा गोंधळ अजूनही सुरूच आहे. मुठा नदीच्या पात्रात राज ठाकरेंच्या सभेला जागा मिळाल्यानंतर आता एसपी कॉलेजचं मैदान उपलब्ध झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे नेमकी सभा कुठे होणार याबाबत संभ्रम अजूनच वाढला आहे. विशेष म्हणजे पुण्यातले पदाधिकारी मात्र या सर्व गोंधळाबाबत अनभिज्ञ आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेला पाहिजे ते ठिकाण मिळालेले नव्हते, त्यामुळे सभा होणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत ही सभा एस. पी. कॉलेजच्याच मैदानावर घेण्याचा आग्रह मनसेने धरला होता. एस पी च्या व्यवस्थापनाने मात्र राजकीय सभेसाठी मैदान उपलब्ध करून देण्याला आधीच नकार दिला होता. त्यामुळे या जागेचा प्रश्न निकाली निघाला.

या सभेसाठी राज ठाकरे दोन दिवस आधीपासूनच म्हणजे शुक्रवारीच पुण्याकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे या विषयात ते काय भूमिका घेतात याकडे आता लक्ष लागले होते. राजकीय पक्षांनी सभा घ्यायच्या तरी कुठे असा संतप्त सवाल करत कार्यकर्ते मात्र एस.पी. वरच सभा घेण्यावर ठाम होते.