
साउथ इंडस्ट्रीचा सुपरस्टार प्रभास, बॉलीवूड स्टार क्रिती सेनॉन आणि सैफ अली खान स्टारर मोस्ट अवेटेड चित्रपट ‘आदिपुरुष’ची प्रेक्षक वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा टीझर सध्या खूप चर्चेत आहे. ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा टीझर 2 ऑक्टोबर 2022 रोजी अयोध्येत एका कार्यक्रमादरम्यान प्रदर्शित झाला होता. मात्र, टीझर पाहिल्यानंतर चाहत्यांची निराशाच झाली.
Adipurush Teaser : सैफ अली खानला ‘रावण’ लूकमध्ये पाहून संतापले दर्शक, केली जात आहे ‘खिलजी’ आणि ‘बाबर’सोबत तुलना
सोशल मीडियावर ‘आदि पुरुष’बद्दल लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. लोक त्याच्या VFX (आदिपुरुष VFX) ची तुलना ‘पोगो’ मधील शोसोबत करत असताना सैफ अली खानचा ‘रावण’ लूक सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. सैफ अली खानला रावणाच्या लूकमध्ये पाहून चाहते प्रचंड संतापले असून ते त्याला जोरदार ट्रोल करत आहेत.
ट्रोल होत आहे सैफ अली खान
या चित्रपटातील सैफ अली खानचा लूक खूपच धोकादायक असल्याचे दाखवण्यात आले आहे. दाढीतील त्याचा रावण लूक पाहून तो चित्रपटात रावण झाला आहे की बाबर की अलाउद्दीन खिलजी असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. इतकेच नाही, तर काही यूजर्स त्याला रावण ऐवजी ‘सस्ता मुघल’ असेही म्हणत आहेत. सोशल मीडियावर सैफ अली खानची खूप खिल्ली उडवली जात आहे. एवढेच नाही तर काही लोक टी-सीरिजला टार्गेट करत आहेत आणि टी-सिरीज चांगल्या चित्रपटांना खराब करत असल्याचेही सांगत आहेत. ‘आदिपुरुष’ चित्रपटाची घोषणा होताच चित्रपटाची झलक पाहण्यासाठी अधीर झालेल्या चाहत्यांच्या प्रतिक्रिया सैफ आणि चित्रपट दोघांनाही अडचणीत आणत आहेत.
आदिपुरुष रिलीजची तारीख
प्रभास ‘आदिपुरुष’मध्ये प्रभू रामाची भूमिका साकारत आहे, जो चित्रपटात राघव बनला आहे. त्याचबरोबर क्रिती सेनॉन सीता बनली आहे. त्याचबरोबर सैफ अली खान रावणाची भूमिका साकारत आहे. पुढील वर्षी 12 जानेवारी 2023 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी 400 कोटींहून अधिक खर्च झाल्याचे बोलले जात आहे.
