दुबईतील हिंदू समाजाला मोठी भेट, दसऱ्याच्या मुहूर्तावर होणार मंदिराचे उद्घाटन


दुबई : दुबईत राहणाऱ्या हिंदू समाजातील लोकांना रामनवमीच्या निमित्ताने मोठी भेट मिळणार आहे. दुबईमध्ये पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन होणार आहे. हे उद्घाटन दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच उद्या 5 ऑक्टोबर रोजी होणार आहे. हे हिंदू मंदिर बांधायला बरीच वर्षे लागली आहेत. खलीज टाइम्सच्या वृत्तानुसार, हे मंदिर सिंधू गुरु दरबार मंदिराचा विस्तार आहे, जे दुबईतील सर्वात जुने मंदिर आहे.

या मंदिराची पायाभरणी 2020 मध्येच झाली होती. या मंदिराच्या उभारणीने दुबईत राहणाऱ्या हिंदू समाजातील लोकांचे स्वप्न पूर्ण झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 5 ऑक्टोबरपासून या मंदिरात सर्वसामान्यांना प्रवेश दिला जाणार आहे. त्याचबरोबर या मंदिरात 16 देवतांच्या मूर्ती आहेत. हिंदू धर्माव्यतिरिक्त कोणत्याही जातीचे लोक या मंदिरात प्रवेश करू शकतील, असे अहवालात सांगण्यात आले होते.

अनौपचारिकपणे हे मंदिर 1 सप्टेंबर रोजी उघडण्यात आले होते. त्या दिवसापासून आजपर्यंत हजारो लोकांनी मंदिराच्या रचनेपासून त्याची भव्यता पाहिली आहे. हे मंदिर बांधण्यासाठी पांढऱ्या संगमरवरी वापरण्यात आला आहे. मंदिराच्या छतावर घंटा बसवण्यात आल्या असून त्या पूर्णपणे हिंदू भौमितिक रचनेने बनवण्यात आल्या आहेत.

मंदिरात प्रवेश करण्याची असेल ही वेळ
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी बुकिंग करणे आवश्यक आहे. प्रवेशासाठी क्यूआर कोड आधारित बुकिंग प्रणाली तयार करण्यात आली आहे. त्याचबरोबर वेबसाइटवरून बुकिंग करण्याचा पर्यायही देण्यात आला आहे. मंदिरात प्रवेश करण्याची वेळ सकाळी 6 ते रात्री 8 अशी ठेवण्यात आली आहे.