हॉलीवूड मधून बॉलीवूड मध्ये आला बेबी बंप फोटो शूट चा ट्रेंड

सेलेब्रिटी विशेषतः बॉलीवूड अभिनेत्री आजकाल सर्रास बेबी बंप म्हणजे गरोदरपणांतले फोटो शेअर करू लागल्या आहेत. सध्या आलीया भट्ट आणि विपाशा बसू त्यांचे गर्भारपणाचे अनेक फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करत आहेत आणि त्यावर सतत चर्चा होते आहे. या ट्रेंडची सुरवात भारतात नाही तर हॉलीवूड मध्ये झाली आहे. हॉलीवूड मधील सेलेब्रिटीच्या प्रेग्नन्सीची न्यूज हेडलाईन असायची. पण त्यावेळी त्यांचे त्या अवस्थेतील फोटो मिळणे अवघड असायचे. पण नंतर अश्या फोटोंची क्रेझ वाढत गेली आणि जेन रसेल, एलिझाबेथ टेलर, जुडी गरलंड, ग्रेस केली, मेरील स्ट्रीप, डेमी मूर या अभिनेत्रीच्या बेबी बंप फोटोनी लोकांचे लक्ष वेधले आणि खऱ्या अर्थाने हा ट्रेंड सुरु झाला. त्यात काही अभिनेत्रींनी बोल्ड फोटो शूट करून हेडलाईन मध्ये जागा मिळविली. ब्रूक शिल्ड, ब्रिटनी स्पिअर्स, अंजेलिना जोली, जुलिया रोबर्ट्स, रिहाना, किम कार्दीशन यांचा त्यात समावेश होता.

मग बॉलीवूड मध्ये हा ट्रेंड येण्यास वेळ लागला नाही. आज येथेही अश्या फोटोंची क्रेझ निर्माण झाली आहे. शिल्पा शेट्टी, ऐश्वर्या राय, ट्विंकल खन्ना यांचे प्रेगनन्सीचे काही फोटो व्हायरल झाले पण ते बोल्ड नव्हते. करीना कपूर, लारा दत्त, नेहा धुपिया, कल्की कोचलीन, जेनेलिया डिसुझा, यांनी हा ट्रेंड बॉलीवूड मध्ये सेट केला.करीनाने तर बोल्ड फोटो शूट केलेच पण अनेक कार्यक्रमात ती अगदी सहजतेने सहभागी होत राहिली. आलीया ने करीनाचा पावलावर पाउल टाकले आहे. तिने सुद्धा तिचे काम सुरु ठेवले आहे.