जगात परदेशी प्रवासासाठी पासपोर्ट आवश्यक नसलेल्या फक्त तीन व्यक्ती

पासपोर्ट अस्तित्वात आले त्याला आता १०० हून थोडी अधिक वर्षे झाली. कोणत्याही देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान एका देशातून दुसऱ्या देशात जाणार असतील तर त्यांना सुद्धा पासपोर्ट आवश्यक असतो. हा पासपोर्ट डिप्लोमॅटिक पासपोर्ट म्हणून ओळखला जातो आणि त्या त्या देशात या पाहुण्यांचे आगत स्वागत सन्मानाने केले जाते. मात्र जगातील २०० पेक्षा जास्त देशात फक्त तीनचा व्यक्ती अश्या आहेत ज्यांना पासपोर्ट लागत नाही.

ब्रिटीश राजा किंवा राणी यांना जगभर कुठेही प्रवास करताना पासपोर्ट लागत नाही याची अनेकांना माहिती आहे. ब्रिटनचे नवे राजे चार्ल्स थर्ड हेही आता जगभर कुठेही पासपोर्ट शिवाय जाऊ शकणार आहेत मात्र यांच्या पत्नीला पासपोर्ट लागणार आहे. रॉयल कुटुंबियांना सुद्धा पासपोर्ट लागतो. त्यांना डिप्लोमॅटिक पासपोर्ट दिला जातो.  दुसरे आहेत जपानचे सम्राट नासहितो आणि त्यांच्या पत्नी सम्राज्ञी मसाको या अन्य अश्या दोन व्यक्ती आहेत ज्यांना परदेशी प्रवास करताना पासपोर्टची गरज नाही. सम्राटपदावरून पायउतार झालेले नासहोतो यांचे वडील अकीहोतो आणि त्यांच्या पत्नीसाठी मात्र आता पासपोर्ट लागतो.

सुरवातीला अनेक लोक एका देशातून दुसऱ्या देशात घुसताना चोरून जाऊ लागले आणि ही समस्या वाढू लागली तेव्हा योग्य कागदपत्रे असल्याशिवाय दुसऱ्या देशात प्रवेश नाही अशी काही योजनाच नवती. त्याचवेळी पहिले महायुध्द सुरु होते आणि सर्वच जगाला पासपोर्टची गरज लक्षात आली. १९२० नंतर पासपोर्ट बाबत गंभीर विचार सुरु झाला त्यात अमेरिकेचा पुढाकार होता. १९२४ मध्यें अमेरिकेने पहिली पासपोर्ट प्रणाली सुरु केली.

सर्व देशांचे पंतप्रधान, राष्ट्रपती यांना खास पासपोर्ट दिला जातो आणि त्यांच्यासाठी विमान तळावर वेगळे मार्ग असतात. भारतात पंतप्रधान, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीना मरुन रंगाचा डिप्लोमॅटिक पासपोर्ट असतो तर उच्च सरकारी अधिकारी, मंत्री यांच्यासाठी पांढऱ्या रंगाचा खास पासपोर्ट दिला जातो. सर्वसामान्य नागरिकांना भारतात निळ्या रंगाचा पासपोर्ट दिला जातो.