मुंबई- टोलबाबत चिथावणीखोर भाषण केल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात पुणे जिल्ह्यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे आगामी काळात राज्य सरकार त्यांच्याविरूद़ध काय कारवाई करणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. यापार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा यांचा आागमी काळात होत असलेला पुणे दौरा चर्चेत आला आहे.
राज ठाकरे यांचे शुक्रवारपासून पुण्यात विविध कार्यक्रम होत आहेत. त्यामुळे याप्रकरणी पोलीस काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. राज ठाकरेंच्या अटकेवरून सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीतच मतभेद निर्माण झाले आहेत. त्यामुळे राज यांना अटक करण्याळपूर्वी या दोन्ही पक्षातील मतभेद दूर व्हावे लागणार आहेत.
राज ठाकरे यांच्या दौ-याच्या कार्यक्रमानूसार शुक्रवारी सकाळी मनसेच्या पदाधिका-याचा मेळावा बीएमसीसी कॉलेजमध्ये होणार आहे. या मेळाव्यात आगामी निवडणुकीची रणनिती ते ठरविणार आहेत. एक फेब्रुवारीला राज ठाकरे पुण्यातील नगरसेवकांची झाडाझडती घेणार असल्याचे समजते. तर दोन फेब्रुवारीचा दिवस त्यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात पोलिस काय कारवाई करणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.