फायनलमध्ये महाराष्ट्राचा डाव ३०५ धावावर आटोपला

हैदराबाद- रणजी करंडकाच्या अंतिम फेरीत महाराष्ट्राचा पहिला डाव ३०५ धावावर आटोपला. चिराग खुराणा व अंकित बावणे यांनी कसदार कामगिरी करत पहिल्या दिवशी महाराष्ट्राचा डाव सावरला होता. मात्र कर्नाटकच्या गोलंदाजानी दुस-या दिवशी सकाळच्या सत्रात दमदार गोलंदाजी करताना निम्मात संघ अवघ्या ३३ धावांत गुंडाळला. शेवटची बातमी हाती आली तेंव्हाद कर्नाटकने पहिल्या डावात बिनबाद ३६ धावा केल्या होत्या.

गुरूवारी दुस-या दिवसाच्या सुरूवातीलाच अंकित बावणे कालच्याी ८९ धावावर बाद झाला. त्यानंतर संग्राम अतितकर आक्रमक फलंदाजी करत दमदार अर्धशतक ठोकले आणि संघाच्या धावसंख्येला आकार दिला. त्यामुळेच महाराष्ट्राला रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या डावात ३०५ धावांची खेळी साकारता आली आहे. कर्नाटकच्या बाजूने कर्नाटकी गोलंदाजांनी महाराष्ट्राचे पहिले तीन मोहरे अवघ्या ९० धावांमध्ये तंबूत धाडून थरार निर्माण केला होता.

दुस-या दिवशी कर्नाटकच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. महाराष्ट्राच्या शेवटच्या चार फलंदाजांना स्वस्तात बाद करण्यात कर्नाटकच्यो गोलंदाजांना यश आले. महाराष्ट्राचे शेवटचे चार फलंदाज व्यक्तीक १० धावांचा टप्पाही गाठू शकले नाहीत. आता महाराष्ट्राच्या ३०५ धावांचे लक्ष्य गाठून त्यापुढे आघाडी मिळविण्याचा कर्नाटकचा प्रयत्न असेल.

Leave a Comment