
नाशिक – गेल्या काही दिवसांपासून रिक्त असलेल्या नाशिक विभागीय महसूल आयुक्तपदी अन्न व औषध प्रशासन(एफडीए) विभागाचे आयुक्त महेश झगडे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे समजते. रवींद्र जाधव यांच्या निवृत्तीनंतर विभागीय आयुक्तपदी कुणाची नियुक्ती होते, याकडे सर्वांचेच लक्ष होते. यात झगडे यांच्या नावाचीही चर्चा होती.
