दाभोलकर हत्या: नागोरीचं घूमजाव, 25 लाखाचं वक्तव्य रागातून

पुणे – डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात आरोपी मनीष नागोरीने कोर्टात आपलं वक्तव्य फिरवलं आहे. एटीएस प्रमुख राकेश मारियांनी 25 लाखांची ऑफर दिली, हे वक्तव्य रागातून केल्याचं, नागोरीने म्हटलं आहे.

20 जानेवारीला दाभोळकर हत्याप्रकरणातील संशयित आरोपी म्हणून मनिष नागोरी आणि विकास खंडेलवाल यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर नागोरीने पोलिसांनी आपल्याला हत्येच्या कबुलीसाठी 20 लाख रुपयांची ऑफर दिल्याचा खळबळजनक आरोप केला होता. त्यानंतर नागोरीनं आता याप्रकरणात घुमजाव केलं आहे.

रागापोटी हे वक्तव्य केलं होतं. त्यात काहीही तथ्य नाही, असं नागोरीनं कोर्टासमोर सांगितलं आहे. कोर्टानं नागोरी आणि खंडलवालला 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.