
पुणे – माजी प्रशासकीय अधिकारी आणि पुणे महापालिकेचे माजी आयुक्त अरूण भाटिया यांनी लोकसभेसाठी समर्थकांनी पाठिंबा द्यावा असे आवाहन पुणेकरांना फेसबुकवरून केले आहे. भाटिया यांनी १३ जानेवारीलाच आम आदमी पक्षांतर्फे निवडणूक लढविण्यासाठीचा अर्ज पक्षाकडे केला आहे. मात्र या अर्जात किमान ६०० समर्थकांचा पाठिबा हवा अशी अट असल्याने भाटिया यांनी फेसबुकवर पाठिबा देण्याचे आवाहन केले आहे.
