मुंबई – राज्यातील एकमेव महापालिका ताब्यात असलेल्या नाशिकमध्ये अपेक्षित विकासकामे होत नसल्याने नाराज असलेले पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी महापौर व नगरसेवकांची चांगलीच हजेरी घेतली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तातडीने कामाला लागा, असे फर्मान सोडतानाच मला ह्यरिझल्ट हवायह्ण असे आदेशच महापौरांना बजावले. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मनसेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या नाशिक महापालिकेच्या नगरसेवकांची आढावा बैठक मंगळवारी मुंबईत घेण्यात आली. या बैठकीत राज ठाकरे यांनी नगरसेवकांची चांगलीच हजेरी घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
ह्यनाशिक पालिकेत सत्ता येऊन दोन वर्षे झाली, या काळात तुम्ही काय केले? तुमच्या अपयशाची उत्तरे लोकांना काय मी द्यायची का?,ह्ण असा सवाल करत राज यांनी सर्व नगरसेवकांना चांगलेच फैलावर घेतले. ह्यआपण नवे म्हणून लोकांनी माझ्या विश्वासावर आपल्याला सत्ता दिली आहे. आणि तुम्ही कामे करण्याऐवजी जर कारणे देत असाल तर ते यापुढे चालणार नाही,ह्ण असे सांगत सगळ्या नगरसेवकांना त्यांनी कामाला लागण्याचे आदेश दिले.
काही नगरसेवकांनी आपण कशी कामे केली हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर राज म्हणाले, ह्यजर कामे झाली असे म्हणता तर ती दिसत का नाहीत आणि माध्यमांंमधून त्यांची चर्चा का होत नाही याचे उत्तर मला द्या?ह्ण या प्रश्नावर सारेच नगरसेवक निरुत्तर झाले. या बैठकीत राज ठाकरेंनी महापौर यतीन वाघ व पक्षाच्या नगरसेवकांना चांगलेच सुनावून कामाला लागण्याचे आदेश काढले.