न्यूझीलंडकडून टीम इंडिया १५ धावांनी पराभूत

हॅमिल्टन- टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुस-या एकदिवयीस सामन्याला ट्वेन्टी-२०चे स्वरूप प्राप्त झाले होते. अटातटीच्या या लढतीत न्युझीलंडने बाजी मारली असून डकवर्थ लुईस पध्दतीने टीम इंडियाचा १५ धावांनी पराभव केला.

नाणेफेक जिंकून टीम इंडियाने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाच्या गोलंदाजीची सुरूवात निराशाजनक झाली होती. परंतु, मध्येच मेघराज बरसले आणि सामना काही काळ थांबवावा लागला. पावसाच्या व्यत्ययानंतर खेळ सुरु झाल्यावर न्यूझीलंडने ८.४ षटकांत १०१ धावा केल्या होत्या. त्यामुळे टीम इंडियासमोरील विजयी लक्ष्य आणखी आव्हानात्मक बनले. न्यूझीलंडने आक्रमक फलंदाजीकरत ४२ षटकांत २७१ धावा ठोकल्या आहेत. त्यामुळे ‘डकवर्थ लुईस’च्या नियमानुसार भारतीय संघाला विजयासाठी अवघ्या ४२ षटकांत २९७ धावा कराव्या लागणार होत्या . याही सामन्यात कोरे अँडरसनने रॉस टेलरच्या साथीने तडफदार फलंदाजी करत अवघ्या १७ चेंडूत ४४ धावा ठोकल्या. रॉस टेलरने संयमी खेळी करत ५७ धावांची अर्धशतकी खेळी साकारली.

न्यूझीलंडच्या २९७ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाच्याळ सलामीवीरांचा याही सामन्यात फ्लॉप-शो पाहण्यास मिळाला. अपेक्षेप्रमाणे विराट कोहलीने दमदार कामगिरी करत ७८ धावांची खेळी साकारली. परंतु, कमी षटके आणि विजयासाठी भरपूर धावांची गरज टीम इंडियाला होती. सामन्याला ट्वेन्टी-२० स्वरूप आल्याने फटकेबाजी करणे महत्वाचे होते. या नादात कोहली झेलबाद झाला. त्यांनतर कर्णधार धोनीने कर्णधारी खेळी करत ५६ धावा करून बाद झाला. त्यानंतर लगेचच जडेजापण बाद झाला. टीम इंडियाला शेवटच्यार तीन षटकात विजयासाठी ४० धावा हव्या होत्या. त्यामुळे भारतीय संघाच्या विजयी आशा मावळल्या होत्या. अखेर टीम इंडियाला ३ चेंडूत विजयासाठी २० धावा हव्याड असताना सामना थांबविण्यायत आला. न्युझीलंडने डकवर्थ लुईस पध्दतीने टीम इंडियाचा १५ धावांनी पराभव केला.

Leave a Comment