आदर्श घोटाळ्याच्या आरोपींच्या यादीतून अशोक चव्हाणांचं नाव हटणार?

मुंबई – आदर्श प्रकरणात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण सीबीआयनं आरोपींच्या यादीतून चव्हाणांचं नाव वगळावं अशी विनंती विशेष कोर्टाकडे केली आहे. आदर्श घोटाळ्यात अशोक चव्हाणांनी आपल्या नातेवाईकांना फ्लॅट मिळवून दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यामुळं त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होतं.

त्यानंतर सीबीआयनं दाखल केलेल्या आरोपपत्रात अशोक चव्हाणांचं नाव होतं. आता मात्र ते नावं काढून घ्यावं अशी विनंती सीबीआयनं विशेष कोर्टाकडं केली आहे.. त्यामुळं निवडणुकीच्या आधी अशोक चव्हाणांच्या डोक्यावरची डांगती तलवार दूर होण्याची शक्यता आहे. मात्र यावर विशेष कोर्ट काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं आहे.