लेनेवोचा होरायझन २ टेबल टॉप पीसी सादर

लेनेवो कंपनीने यांचा नवा टेबल टॉप पीसी होरायझन २ लास वेगासमध्ये भरलेल्या इलेक्ट्रोनिक जत्रेत सादर केला आहे. कंपनीने गतवर्षी सादर केलेल्या होरायझन चे हे अपग्रेडेशन आहे. विंडोज आठ ओएस ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणार्‍या या पीसीला २७ इंची एचडी स्क्रीन देण्यात आला आहे.

याचे वैशिष्ठ म्हणजे हा पीसी एकाचवेळी चार जणांना वापरता येतो तसेच टेबल मोड शिवाय तो सामान्य डेस्कटॉप प्रमाणेही वापरता येतो. मागील मॉडेलपेक्षा हा जाडीला कमी आहे तसेच त्याला ऑरा मल्टिमिडीया दिला गेला आहे. यात एकाचवेळी चार जण सापशिडी, ल्युडो, पोकर अथवा बुद्धीबळ असे खेळही खेळू शकणार आहेत. त्यासाठी खास फासे आणि स्टीक्स दिल्या गेल्या आहेत.

यासोबत असलेल्या होरायझन अॅपमुळे हा पीसी अँड्राईड स्मार्टफोनशी कनेक्ट करता येतो आणि फोन हलविला की त्यातील फोटो पीसीवर ट्रान्स्फर करता येतात.