नागपूर: नरेंद्र मोदीचा फेव्हकर आज काल सर्वत्र जाणावत असून बॉलीवूडच्यां मंडळीनेही आतापासूननच त्यांचा प्रचार करण्यास सुरूवात केली आहे. स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव नरेंद्र होते, असं म्हणत सिनेअभिनेता विवेक ओबेरॉयनं नरेंद्र मोदींची तुलना विवेकानंद यांच्याशी करत आगामी काळात त्यांना देशाचा पंतप्रधान करावे असे मत अभिनेता विवेक ओबेरॉय यांनी नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आयोजित केलेल्या विवेकानंद जयंती सोहळ्यात व्यक्त केले.
या वेळी मंचावर खुद्द नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांची उपस्थिती होती. इतकेच नव्हे तर मोदी यांना पंतप्रधानपदावर बसवा असे जाहीर आवाहनही अभिेनेता विवेक ओबेरॉयने यावेळी केले होते. यावेळी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी व सरसंघचालक मोहन भागवत यांनी मार्गदर्शनपर विचार मांडले.
यावेळी पुढे बोलताना विवेक ओबेरॉय म्हथणाला, देशात बदल घडवणे आवश्यक आहे. देशाला विवेकानंदांसारखे विचार असलेल्याव योद्ध्याची ख-या अर्थाने गरज आहे. मात्र विवेकानंदांचे खरं नाव काय होते, हे आता सर्वोंनी लक्षात घ्या”, असे सांगत त्याने अप्रत्यक्ष नरेंद्र मोदींना मत देण्याचे आवाहन केले.