कोल्हापूर टोलप्रकरणी दोन हजार जणांवर गुन्हे

कोल्हापूर: टोलप्रकरणावरून कोल्हापूरकरांनी रविवारी टोल नाके पेटवून दिले. रविवारी झालेल्या राड़यामुळे शहरातील दोन हजार जणांविरूध्द पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. टोलविरोधी आंदोलनामुळे पेटलेल्या कोल्हापुरात सोमवारी सर्वपक्षीयांनी पुकारलेल्या बंदमुळे शुकशुकाट आहे. रविवारी ज्या ठिकाणी आगीचे लोळ उठले होते, त्याठिकाणी सोमवारी स्मशानशांतता आहे.

कोल्हापूरात काल झालेल्या राड़यामुळे दोन हजार जणांविरूध्द व तणाव निर्माण करणे, प्रक्षोभक भाषणे करणे, सामाजिक शांतता भंग करणे असे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. विशेषता यामध्ये महापौर सुनीता राऊत यांच्यासह शिवसेनेचे तीन आमदार चंद्रदीप नरके, राजेश क्षीरसागर आणि डॉ.सुजित मिणचेकर यांचा समावेश आहे.

रविवारी झालेला आगडोंब पाहता पोलिसांनी सोमवारी कोल्हानपूर शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. खरे तर कोल्हापूरचा टोल रद्द करू असे आश्वासन सत्तााधारी पक्षाच्यार नेत्यांनी दिले होते. पण तरीही वसुली करण्यातत आल्या्ने कोल्हापूरकरांचा राग अनावर झाला. आंदोलकांनी तीन टोलनाक्यांची जाळपोळ केली. तर सर्वच्या सर्व नाक्यांवर तोडफोड केली. त्यानंतर सोमवारी टोलवसुलीच्या विरोधात सर्वपक्षीयांनी बंद पुकारला आहे.