बिजिंग- दक्षिण सिल्क रूटवरील १३०० वर्षंचे जुने दुकजोंग हे प्राचीन तिबेटी शहर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असल्याचे वृत्त आहे. या प्राचीन शहराला लागलेल्या आगीत २४० घरे जळून खाक झाली तर २६०० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. जिवितहानीबाबत अद्यापी कांहीही माहिती समजू शकलेली नाही.
या संदर्भात चिनी संवाददात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार दुकेजोंग नावाचा अर्थच चंद्राचे शहर असा आहे. शनिवारी या शहराला आग लागली. १० तास आगीचे थैमान सुरू होते आणि १ हजारांहून अधिक लोक आग विझविण्याचा प्रयत्न करत होते. मात्र या प्राचीन शहरातील बहुसंख्य घरे लाकडाची असल्याने आग नियंत्रणात आणणे कठीण झाले होते. या आगीत घरे, दुकाने, सांस्कृतिक इमारती. प्राचीन तिबेटी थांगका पेंटींग्ज व अन्य कलाकृती जळून भस्मसात झाल्या असल्याचेही सांगितले गेले आहे.