
मुंबई – जर्मन कार उत्पादक कंपनी मर्सिडीज बेंझने या वर्षात ८ नवी मॉडेल्स भारतीय बाजारात आणण्यात येणार असल्याचे जाहीर केले असून गेल्यावर्षातही कंपनीने ८ मॉडेल्स सादर केली होती. कंपनीने वाढती विक्री आणि कंपनीचा विकास कायम राखण्यासाठी आखलेल्या योजनेनुसार आठ नवी मॉडेल्स बाजारात आणली जात आहेत असे मर्सिडीज बेंझ इंडियाचे सीईओ एबरहार्ड केर्न यांनी सांगितले.
