डॉ. दाभोलकरांना मरणोत्तर पद्म पुरस्कार जाहीर होण्याची शक्यता

मुंबई : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकरांना मरणोत्तर पद्म पुरस्कार जाहीर होण्याची शक्य़ता वर्तविण्यात येत आहे. राज्य् सरकारने जारी केलेल्या संभाव्य यादीत डॉ.नरेंद्र दाभोलकरांचे नाव अग्रभागी आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकरांना मरणोत्तर पद्म पुरस्कार मिळाल्या स त्यांहनी केलेल्याय़ कामांचा ख-या अर्थाने गौरव होईल.

आपले अवघे आयुष्य अंधश्रद्धा निर्मुलनासाठी खर्ची घालणा-या दाभोलकरांच्या हयातीत अंधश्रद्धा निर्मुलन कायदाही पास झाला नाही. त्यांच्या कार्याचा यथोचित गौरवही सरकारने केला नाही. मात्र सरकारला आता उशीरा जाग आल्याचे दिसते आहे.

उशिरा का होईना राज्य सरकारला दाभोळकरांच्या त्यागाची आठवण झाली आहे. त्यामुळं लवकरच डॉ.नरेंद्र दाभोळकर यांना मरणोत्तर पद्म पुरस्कार जाहीर होण्याची शक्यता आहे. दाभोलकरांना मरणोत्तर पद्म पुरस्कार मिळाल्याळस त्यांानी केलेल्याय कामांचे ख-या अर्थाने चीज होणार आहे.