बिजिंग – चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टचे नेते व चीनचे पंतप्रधान शी जिगपिंग यांनी भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी सुरू केलेल्या अभियानांतर्गत गतवर्षात १ लाख ८२ हजार अधिकार्याना शिक्षा सुनावण्यात आल्या असल्याचे समजते.

चीममध्ये भ्रष्टाचाराचे प्रमाण खूपच वाढले होते.२०१२ सालात भ्रष्टाचाराचे प्रमाण १३.३ टक्कयांनी वाढले होते. त्यावर जिंगपिग यांनी कडक शिक्षा सुनावण्याचा मार्ग चोखाळला आहे. यंदा शिक्षा झालेल्यांत ८ हाय प्रोफाईल अधिकारी आहेत तर २३ अन्य अधिकार्याची चौकशी सुरू आहे.
शिक्षा सुनावल्या गेल्याला १.८२ लाखांपैकी दीड लाख जणांना भ्रष्टाचार कायदा मोडल्याप्रकरणी शिक्षा सुनावल्या गेल्या आहेत. ४८९०० सरकारी कर्मचार्याना प्रशासकीय दंड ठोठावला गेला आहे. चीनच्या पॉलिट ब्यूरोचे वरीष्ठ सदस्य झोऊ योगकोंग यांच्या मुलाचीही भ्रष्टाचार केल्याप्रकरणी चौकशी सुरू आहे. झोऊ माजी राष्ट्राध्यक्ष हू जिताओ यांच्या सरकारमध्ये पॉलिट ब्यूरोचे सदस्य होते. तपासानंतर झोऊ यांनाही अटक केली जाऊ शकते असे सांगितले जात आहे.
या अभियानातंर्गत चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचे नेते बो शिलाई यांना जन्मठेप तर अन्य नेत्यांना यापूर्वीच मृत्यूदंडाच्या शिक्षा ठोठावल्या गेल्या आहेत.