पुणे – केसरी मराठा संस्थेतर्फे दिला जाणारा लोकमान्य टिळक पुरस्कार यंदाच्या वर्षी मल्याळी मनोरमा या लोकप्रिय साप्ताहिकाचे मुख्य संपादक मेमन मॅथ्यू यांना दिला जाणार आहे. ४ जानेवारी रोजी टिळक वाड्यात होणार्याू समारंभात हा पुरस्कार मॅथ्यू यांना दिला जाईल.
संस्थेचे अध्यक्ष डॉ.दीपक टिळक या संदर्भात अधिक माहिती देताना म्हणाले की पत्रकारितेत उल्लेखनीय कामगिरी बजावणार्या पत्रकारांना हा पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचे हे सहावे वर्ष आहे. यंदाचा पुरस्कार मॅथ्यू यांना जाहीर झाला असून यापूर्वी वीर संघवी, एन. राम, एच.के दुआ, श्रवण गर्ग आणि विनोद मेहता हे या पुरस्काराचे मानकरी ठरलेले आहेत.