लखनौत एचसीएल वसविणार आय टी सिटी

लखनौ -एचसीएल कंपनी लखनौ जवळ १०० एकर क्षेत्रात आय टी शहर वसविणार असून त्यामुळे २५ हजार रोजगार निर्माण होणार आहेत. उत्तर प्रदेश सरकारने एचसीएलच्या वामासुंदरी इनव्हेस्टमेंट या गुंतवणूक विभागाकडे वरील आयटी सिटी निर्माणाचे काम सूपूर्द केले आहे.

या प्रकल्पांतर्गत ६० एकर क्षेत्रात आय टी व आयटीशी संबंधित कारखाने उभारले जाणार आहेत. त्याचबरोबर येथे औद्योगिक सुरक्षा दक्षता केंद्रही उभारले जाणार आहे. या केंद्रात एकावेळी ५ हजार जणांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था होऊ शकणार आहे. या आयटी सिटीमुळे उत्तर प्रदेशाच्या आर्थिक विकासाला हातभार लागणार आहेच पण त्यामुळे औद्यागिक विकासालाही प्रोत्साहन मिळेल असे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment