रेनो फर्नांडीसने घेतले आपचे सदस्यत्व

गोवा -गोव्यातील लोकप्रिय पॉप स्टार गायक रेनो फर्नांडीस याने आम आदमी पार्टीचे सदस्यत्व घेतले असल्याचे फेसबुकवर जाहीर केले आहे. दिल्लीत गायक व संगीतकार कैलाश खेरनेही आम आदमी पार्टीसाठी नुकताच आपला आवाज दिला आहे. त्या पाठोपाठ आता रेनेा पार्टीचा सदस्य बनला आहे.

रेनो म्हणतो की मी आजपर्यंत कधीच कुठल्या राजकीय पक्षाचे सदस्यत्व घेतलेले नाही मात्र प्रथमच आम आदमी पार्टीबद्दल मला विश्वास वाटल्याने त्यांचे सदस्यत्व घेतले आहे. रेनोने आपची पारंपारिक टोपी आणि एका हातात सदस्यत्वाची पावती व दुसर्‍या हातात पार्टीचे चिन्ह असलेला झाडू घेतलेले आपले छायाचित्रही फेसबुकवर टाकले आहे. रेनोचा निवडणूक लढविण्याचा मात्र कोणताही विचार नाही. तो फक्त पक्षासाठी कार्य करणार आहे.