दिल्लीकरांना मिळणार ६६७ लिटर मोफत पाणी

गाझीयाबाद- निवडणूक प्रचारादरम्यान दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत आम आदमी पक्षाच्या सरकारने दिल्लीकरांना महिन्याला ६६७ लिटर मोफत पाणी वाटपाची घोषणा सोमवारी केली.मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

बैठकीस दिल्ली जल बोर्डाचे अधिकारी उपस्थीत होते. एक जानेवारी २०१४पासून सर्व घरगुती ग्राहकांना महिन्याला २० लिटर पाणी मोफत मिळणार असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. यासाठी कोणताही अतिरिक्त कर किंवा अधिभार लावणार नसल्याचे दिल्ली जल बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय कुमार यांनी सांगितले.