रशियात आत्मघाती हल्ला, १८ ठार

मॉस्को- रशियात एका रेल्वे स्थानकामध्ये झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात १८ जण ठार झाले आहेत. दक्षिण रशियातील वोल्गोग्राद शहरातल्या रेल्वे स्थानकात एका महिलेने स्वतःला उडवले. या महिलेने मुख्य रेल्वे स्थानकामध्ये बॉम्बस्फोट घडवून आणला. हल्ल्यात ५०हून अधिक जण जखमी झाले आहेत.

दपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी रेल्वे स्थानकात मोठा स्फोट झाल्याचे पोलिस अधिका-यांनी सांगितले. दहशतवाद विरोधी पथकाने हा हल्ला महिलेने केल्याचे म्हटले आहे. याआधीही २१ ऑक्टोबर रोजी वोल्गोग्राद शहरात झालेल्या महिलेने केलेल्या आत्मघाती हल्ल्यात सात जण ठार झाले होते. विशेष म्हणजे फेब्रुवारी महिन्यात रशियामध्ये हिवाळी ऑलिपिंक होणार आहे. दहशतवाद्यांनी हा हल्ला केला आहे.