वीणाविरुद्ध बॉयफ्रेंडची पोलिसांत तक्रार

मुंबई – नेहमीच या ना त्या कारणाने वादाच्या भोव-यात अडकणे अभिनेत्री वीणा मालिकला पसंत पडते. नुकताच पाकिस्तानी मॉडेल-अभिनेत्री वीणा मलिकने नुकतंच दुबईत विवाह केला आहे. विवह करून अजून एक आठवडाही उलटत नाही तोच वीणाच्या पूर्व बॉयफ्रेंडनं मुंबईमध्ये वीणाविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. वीणावर तिच्या पूर्व बॉयफ्रेंडला आणि त्याच्या कुटुंबीयांना धमकी देण्याची तक्रार दाखल झाली आहे. पोलिस या प्रकरणाची चौकशी करीत आहेत.

वीणा मालिकचा प्रशांत हा माजी बॉयफ्रेंड मुंबईमध्ये राहतो. प्रशांतच्या म्हणण्यानुसार, वीणा आणि तो गेल्या दीड वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये आहेत. ‘अगदी दुबईला जाण्याअगोदरपर्यंत ती माझ्यासोबतच होती. दुबईला जाणार असल्याचेही तिनं मला सांगितले होते. पण, तिथं जाऊन तिनं लग्न केलं ही बातमी मला मीडियातून समजली. ही बातमी ऐकून मला धक्काच बसला. यासंबंधी मी जेव्हा मीडियाशी बोललो तेव्हा वीणाकडून मला धमकीचे फोन येऊ लागले’ असे प्रशांतने म्हटले आहे.

वीणकडून त्यामला ‘मीडियासमोर काहीही बोललास तर तुझी तुझ्या कुटुंबीयांना बदनाम करेन… तुझ्या कुटुंबीयांकडेही बघून घेईन ’ अशी धमकीही दिली असल्याकचे प्रशांत म्हऊणाला. याबद्दल प्रशांतने आरे पोलीस स्टेशनमध्ये शनिवारी तक्रार दाखल केली. परंतु, पोलिसांनी मात्र अजून एफआयआर दाखल केलेली नाही. याबाबत पोलिसांनी मला कोर्टात जाऊन केस करायला सांगितले असल्या चे प्रशांत यावेळी बोलताना म्हेणाला.