अभिनेत्री गौहर खान ‘बिग बॉस’ची विजेती

लोणावळा: बिग बॉस-७ या रियलिटी शोची विजेती मॉडेल आणि अभिनेत्री गौहर खान ठरली आहे. बिग बॉसचा ग्रँड फिनाले यानिवारी रात्री उशीरा लोणावळ्यात पार पडला. यामध्ये तिची स्पर्धक असलेल्याब अभिनेत्री तनिशा मुखर्जीने दुसरे स्थान पटकावले. तर एजाज खानला मात्र तिस-या क्रमांकावर समाधान मानावे लागले. चौथा स्पर्धक संग्राम सिंग ग्रँड फिनालेमधून आधी बाहेर पडला होता.

गौहर खानला ५० लाखांचे कॅश आणि मानचिन्ह मिळाले. हे सर्व स्पर्धक सुमारे १०४ दिवस लोणावण्यातील बिग बॉसच्या घरात होते. सातव्या पर्वातील स्पर्धक कुशल टंडनसोबतची गौहरची केमिस्ट्री बरीच चर्चेत होती. एकमेकांबद्दलच्या भावना त्यांनी उघडपणे मान्यही केल्या होत्या.

गेल्या अनेक दिवसांपासून बिग बॉस शो या ना त्या कारणाने चर्चेत होता. त्याला आता पूर्णविराम मिळाला आहे. यावेळी बिग बॉस-७ या रियलिटी शोचा ग्रैंड फिनाले एकूण तीन तास चालला. यामध्येह अभिनेता सलमान खान अभिनेत्री एली एबराम, छोटया पडद़यावरील अभिनेत्री प्रत्यूषा आणि काम्या पंजाबी हे देखील सलमानच्या सोबत थिरकला. बिग बॉस मधून नुकताच बाहेर पडलेला एंडी आणि अरमान कोहली देखील यावेळी परफॉर्म केला.

Leave a Comment