अभिनेता सलमान खान झाला ४८ वर्षाचा

मुंबई: बॉलिवूडचा टायगर म्हणून ओळख असलेला सुपरस्टार अभिनेता सलमान खानचा शुक्रवारी ४८ वा वाढदिवस आहे. शुक्रवारी त्याच्या चाहत्यांनी सलमानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या बांद्र्यातल्या घराबाहेर गर्दी केली आहे. सध्याच सलमान त्याच्या कुटुंबियासोबत पनवेलच्या फार्म हाऊसवर वाढदिवसाचे सेलिब्रेशन करणार आहे.

अभिनेता सलमान खानचा जन्म २७ डिसेंबर १९६५ रोजी मध्यप्रदेशात झाला होता. आज त्याचा ४८ वा वाढदिवस आहे. या निमित्ताने फॅन्स सोशल नेटवर्किंग साईटवर त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. सलमानने १९८८ मध्ये बिवी हो तो ऐसीमधून आपल्या सिनेमाची कारकीर्द सुरुवात केली होती. मात्र एक वर्षानंतर आलेला सलमानच्या मैने प्यार किया बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट ठरला. या सिनेमानंतरच सलमानला प्रसिद्धी मिळाली.

सलमानच्या वॉण्टेड, दबंग, दबंग-२ आणि एक था टायगर या सिनेमांनी तर बॉक्स ऑफिसवर 100 कोटींहून अधिक कमाई केली. तर साजन, हम आपके है कौन, हम दिल दे चुके सनम या चित्रपटांमध्ये त्याचा दमदार अभिनय पाहायला मिळाला. तर दुसरीकडे बिग बॉस या कार्यक्रमांद्वारे त्याने टिव्हीवरही आपली दबंगगिरी दाखवून दिली.