मनुष्यबळविषयक करार

पुणे : देशाच्या दूरसंचार क्षेत्राला लागणारे मनुष्यबळ निर्माण करण्यास टेलिकॉम सेक्टर स्किल कौन्सिल( टीएस एस सी ) आणि येथील एम आय टी स्कूल ऑफ टेलिकॉममध्ये सामंजस्य करार करण्यात आला असून जानेवारी महिन्यापासून अभ्यासक्रम सुरु होणार असल्याचे टीएसएससीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे जेना आणि मिटसॉटचे संचालक मिलिंद पांडे यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केले.

केंद्र सरकारने येत्या ओगस्टपर्यंत ८ ० हजार लोकांना प्रशिक्षण देण्याचे ठरवले असून त्यासाठी एक हजार कोटी रुपये टीएसएससीकडे वर्ग झाले आहेत अशी माहिती देऊन जेना म्हणाले की २ ० २ ० पर्यंत या क्षेत्रात ५ ० लाख रोजगार निर्माण होणार आहेत मात्र पुरेसे मनुष्यबळ नाही हे लक्षात घेऊन सरकार , दूरसंचार कंपन्या आणि शिक्षण संस्था यांच्या सहकार्याने देशभर हा कार्यक्रम राबवला जाणार आहे. सरकारची १ ७ खाती याबाबत समन्वयाने काम करत आहेत.

सरकारने काही अभ्यासक्रमासाठी ऑस्ट्रेलिया सरकारशी करार केला आहे. सेल फोन विक्री दुरुस्ती, सेवा पुरवठा, पायाभूत सुविधा ,नेटवर्क सेवा क्षेत्रात होतकरू लोकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. गुजरात , केरळ, तामिळनाडू अशा राज्यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. सुमारे १ ० ० उद्योग या उपक्रमात सहभागी झाले आहेत. बाराव्या पंचवार्षिक योजनेत या क्षेत्रात सुमारे एक लाख कोटी रुपये गुंतवणूक होणार असल्याने किती रोजगार निर्मिती होईल हे लक्षात येईल. आतापर्यंत दोन हजार जणांना असे प्रशिक्षण चाचणी तत्वावर देण्यात आले आहे.

Leave a Comment