आप च्या सरकारला कॉंग्रेसने दिली ९० दिवसांची मुदत

नवी दिल्ली – दिल्लीत अधिकारारूढ होणार असलेल्या आम आदमी पार्टीच्या सरकारला पाठींबा देत असतानाच कॉंग्रेस पक्षाने पाठिंब्याबाबतचा गोंधळ आणखी वाढवत सरकारला आपला कार्यक्रम अमलात आणण्यास ९० दिवसांची मुदत दिली आहे. पक्षाचे नेते संदिप दीक्षित यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. कॉंग्रेसचा पाठींबा तूर्तास तरी काढून घेण्याचा काही प्रश्‍नच नाही, असे दीक्षित यांनी सांगितले.

आम आदमी पार्टीच्या सरकारने सत्तेवर आल्याच्या दुसर्‍या दिवशी दिल्लीतल्या प्रत्येक घराला दर दिवशी ७०० लिटर पाणी मोङ्गत देण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर आहेत ते विजेचे दर निम्मे करण्याचे आश्‍वासन दिले आहे. पंधरा दिवसात जनलोकपाल विधेयक सादर करण्याचीही हमी या सरकारने दिली आहे. ही आश्‍वासने या सरकारने पुरी करावीत, पण तीन महिन्यात ती पुरी न केल्यास कॉंग्रेस पक्ष आपल्या पाठिंब्याचा ङ्गेरविचार करील असे श्री. दीक्षित म्हणाले.

कॉंग्रेस पक्षाने आम आदमी पार्टीच्या सरकारला पाठींबा दिलेला आहे तरीही कॉंग्रेसचा भ्रष्टाचार उघड करणार, असे आम आदमीच्या नेत्यांनी जाहीर केले आहे. त्यांच्या या घोषणेने कॉंग्रेसच्या नेत्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे आणि त्यांनी आम आदमी पार्टी सरकारला, सूडाचे राजकारण न करण्याचे आवाहन केले आहे.