मॉस्को – ए.के. ४७ आणि ए.के. ५६ या आधुनिक बंदुकांचा शोध लावणारा रशियन तंत्रज्ञ मिखाईल कलाश्निकोव्ह याचे काल वयाच्या ९४ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. कलाश्निकोव्ह हा गेल्या सहा महिन्यांपासून आजारी होता. रशियाच्या उद्मरुशिया या परगण्यातील एका रुग्णालयात त्याचे निधन झाले असल्याचे त्याच्या मुलाने जाहीर केले.
जगभरामध्ये दुसर्या महायुद्धात विकसित झालेल्या बंदुका साधारणपणे वापरल्या जात होत्या, परंतु त्यांच्यातील अनेक दोष कमी करून मिखाईल कलाश्निकोव्ह याने ए.के. ४७ ही रायङ्गल विकसित केली. ती वापरायला सुटसुटीत आणि मारा करण्यास उत्तम असल्यामुळे ती जगभर लोकप्रिय झाली. विविध देशात झालेल्या बंडाळ्यांमध्ये ज्या गटांना रशियाने मदत केली त्यांना प्रामुख्याने या नव्या बनावटीच्या रायङ्गली देण्यात आल्या. त्यामुळे त्या जगभर विखुरल्या.
या रायङ्गली विकसित होण्याआधी अमेरिकेची एम.१६ ही रायङ्गल ङ्गार लोकप्रिय होती. पण ए.के. ४७ ने तिला मागे टाकले. जगभरात आज दहा कोटी ए.के. ४७ रायङ्गली वापरल्या जात आहेत. व्हिएतनाम युद्धामध्ये बंडखोरांजवळ ए.के. ४७ रायङ्गली असत. त्यांना अमेरिकन सैनिकांकडून मृत्यू येत असे, तेव्हा अमेरिकेचे सैनिक आपल्या देशातल्या एम-१६ या रायङ्गली बाजूला टाकून मृत जवानांच्या ए.के. ४७ रायङ्गली प्राधान्याने पळवत असत.