मुंबई – देवयानी खोब्रागडे प्रकरणावर उपाय निघण्याची चिन्हे असल्याचे भारत आणि अमेरिकेकडून सांगण्यात येत आहे. देवयानी यांना संयुक्त राष्ट्रात शिफ्ट करण्यास अमेरिका राजी असल्याचे समजते आहे. म्हणजेच देवयानी यांची बदली यूएनमध्ये झाली तर त्यांना राजदुत असण्याची सगळी सुट मिळेल आणि त्यांच्यावर अमेरिका खटला भरू शकणार नाही. पण यात अडचण आहे ती देवयानी यांचे पती आकाशसिंग राठोड यांची.
राठोड हे वाईनचे प्राध्यापक आहेत आणि ते अमेरिकन नागरीक आहेत. देवयानी यांची यूएनमधील एकदा जबाबदारी संपली तर त्यांना राजदुत म्हणून असलेली सुटही संपेल आणि मग त्यांना कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते. बरं अमेरिकेत राहायचेच नाही असे ठरले तर मग देवयानी यांचे पती हे अमेरिकन नागरीक असल्याने त्यात अडचणी येतात. त्यामुळे अमेरिका सोडणे देखील देवयानी यांना अवघड आहे.
सध्या यावर काय उपाय करायचे याचा शोध सुरु आहे. आकाशसिंग राठोड यांना वाईनचे तत्वेत्ते म्हणून ओळखले जाते. आकाशसिंग राठोड यांचा वाईनचा मोठा अभ्यास आहे. अमेरिकेत त्यांचा वाईनचा छोटासा बिझनेसही आहे. भारतीय, अफगाण आणि इराणी वाईन्सच्या अभ्यासासाठी त्यांना दौरेही करावे लागतात. भारतीय वाईन अमेरिकेत प्रसिद्ध करण्याचीही त्यांच्यावर जबाबदारी आहे.
अशा स्थितीत देवयानी खोब्रागडे यांची अडचणी वाढतांना दिसत आहेत. त्यामुळे हा तिढा नेमका सुटतो कसा या पेचात दोन्ही देश सापडले आहे. तर इकडे 1999 मध्ये देवयानी यांना आवडीची भाषा मिळावी यासाठी त्यांच्या संपूर्ण बॅचसाठीच नियम बदलल्याचे स्पष्ट झाले आहे. आयएफएस म्हणून निवड झाल्यानंतर प्रत्येकाला फॉरेन सर्व्हिसमध्ये त्यांच्या रँकनुसार एक परदेशी भाषा निवडण्याचे स्वातंत्र्य असते. आणि त्या आधारावरच त्यांच्या पोस्टींगही होत राहातात. देवयानीचा रँक कमी असतानाही तिला जर्मन भाषा मिळावी म्हणून चक्क नियम बदलले गेले.
त्यासाठी आयएएस सेवेत असलेल्या तिच्या वडीलांनी म्हणजेच उत्तम खोब्रागडेंनी राजकीय संबंध वापरल्याचाही त्यावेळेस आरोप करण्यात आला. देवयानीच्या विरोधात त्याच्याच दुसरा बॅचमेट असलेला महावीर सिंघवी हा कोर्टात गेला. २९ जुलै २०१० रोजी कोर्टाने निर्णय देत देवयानी यांना फेवर करण्यासाठी नियमात बदल केल्याचे स्पष्टपणे सांगितले. त्यासाठी केंद्राला दंडही ठोठावण्यात आला.
देवयानीचा सिरीअल क्रमांक होता सात आणि महावीर सिंघवीचा दोन तरीही देवयानीला जर्मन भाषा मिळावी म्हणून सिंघवीला भाषा निवड स्वातंत्र्यच नाकारण्यात आले होते. त्यामुळे अमेरिकेतला व्हिसा घोटाळा, त्यानंतर आदर्श घोटाळ्यात अपात्र सदनिका यामुळे आधीच अडचणीत असलेल्या देवयाची यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.