नसीरुद्दीन शाहच्या मते ‘भाग मिल्खा भाग’ हा बनावट सिनेमा

मुंबई- गेल्या काही दिदवसांपूर्वी रिलीज झालेला ‘भाग मिल्खा भाग’ हा सिनेमा पूर्णपणे बनावट असल्या ची प्रतिक्रिया ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी व्यनक्तस केली आहे. फरहानने नक्कीच सिनेमात स्वत:वर खूप मेहनत घेतली आहे. त्याअसाठी त्यानने मसल्स बनवणे, केस वाढवणे. पण तितका अभिनयाबाबत प्रयत्न केले नसल्याेचे यावेळी बोलताना नसीरने स्पष्ट केले आहे.

अभिनेते नसीरुद्दीन शाह यांचा आगामी ‘देढ इश्किया’ हा सिनेमा लवकरच रिलीज होत आहे. यात हुमा कुरेशी आणि माधुरी दीक्षित सोबत तो झळकणार आहे. हा सिनेमा १० जानेवारीला रिलीज होत आहे. यावेळी पुढे बोलताना अभिनेता नसीरुद्दीन शाह म्हणाला, या सिनेमात फरहानने मिल्खा सिंग सारखा दिसण्याचा प्रयत्न केला आहे. मिल्खा ते पाहून खूश झाले. कारण १९६०चा त्यांचा फोटो पाहिल्यास फरहानला बघून त्यांना ते आठवलं. भाग मिल्खा भाग’ हा सिनेमा भारतीय अॅथलेटिक मिल्खा सिंग यांच्या आयुष्यावर आहे. ज्यात मिल्खा सिंग यांची भूमिका अभिनेता फरहान अख्तर यांनी केली आहे.

हा सिनेमा यावर्षी ५ जुलैला रिलीज झाला होता आणि सिनेमाने १०० कोटींचा बिझनेसही केला आहे. देशातल्या सर्वच वयोगटातल्या प्रेक्षकांनी सिनेमाला आपली पसंती दर्शविली. सिनेमात फरहान मिल्खा सारखा नाही तर रॉकी दिसतो, असे नसीरुद्दीन शाह यांना म्ह टले आहे. मुली फरहानच्या या लूकवर फिदा झाल्या. मात्र तो मिल्खा सिंग सारखा दिसत नव्हता. त्यामुळे हा सिनेमा खूप बनावट आहे. मात्र तांत्रिकदृष्ट्या सिनेमा खूप चांगला आहे, असेही नसीर यानी यावेळी बोलताना स्पष्ट केले.