पुणे : यावर्षी ऑस्करच्या प्राथमिक फेरीसाठी ‘टूरिंग टॉकीज’या पहिल्याेच मराठी चित्रपटाची निवड झाली आहे. ऑस्करच्या प्राथमिक फेरीसाठी निवड झालेला हा एकमेव मराठी सिनेमा आहे. या वर्षी भारतातर्फे ‘द गुड रोड’ या गुजराती सिनेमाचे अधिकृत नामांकन करण्यात आले होते. तर ‘टूरिंग टॉकीज ’ मात्र अमेरिकेत प्रदर्शित झालेला सगळ्यात आवडता मराठी सिनेमा ठरला आहे.या सिनेमाचे लेखन-दिग्दर्शन गजेंद्र अहिरे यांनी केले असून तृप्ती भोईर त्याच्या निर्मात्याआहेत.त्यांची चित्रपटात मुख्य भूमिकाही आहे.
या सिनेमाची ऑस्कारसाठी निवड झाल्याहने बोलताना दिग्दर्शक गजेंद्र अहिरे म्हणाले, आता लयाला जाणार्या टूरिंग टॉकीज (तंबूतला सिनेमा ) आणि त्याच्याशी संबंधित नागरिकांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे. हा सिनेमा आम्ही अमेरिकेतील लॉस एंजेलिसला प्रदर्शित केला होता. तिथूनच त्याची निवड झाली. यासाठी आम्ही कुठलीही एंट्री पाठवली नव्हती. या चित्रपटाची एवढय़ा मोठय़ा प्रमाणात दखल घेतली गेली याचा आनंद आहे. विशेष म्हणजे या सिनेमाचा समावेश खुल्या विभागातील स्पर्धेत झाला आहे.
खुल्या स्पर्धेसाठी निवड झालेला ‘टूरिंग टॉकीज ’हा पहिलाच मराठी सिनेमा आहे. १६ जानेवारीला जाहीर होणार्यास नामांकनात या सिनेमाला काही वैयक्तिक नामांकने मिळतात का हे स्पष्ट होईल. अहिरे म्हणाले, आता आम्हाला हा सिेनेमा ज्युरींना माहित व्हावा म्हणून प्रयत्न करावा लागेल. आंतरराष्ट्रीय महोत्सवात झळाकणारे सिनेमा ज्युरीना माहित असतात. इथे तशी परिस्थिती नसते. या विभागात आता सुमारे २७५ सिनेमे आहेत. त्यातील फक्त १० पुढील फेरीत जातील. त्यामुळे पुढची वाट खडतर आहेच.