मुंबई- मुंबईत रविवारी दुपारी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदीं यांची सभा होत आहे. मात्र मोदींच्या या सभेवर गेल्याी काही दिवसांपासून दहशतवादी हल्ल्याची छाया आहे. गेल्या काही दिवसांपासून मोदी हे विविध दहशतवादी संघटनांच्या टार्गेटवर आहेत. त्यातच मोदींच्या या सभेवर दहशतवादी हल्ला होऊ शकतो असे गुप्तचर यंत्रणांचे रिपोर्ट्स आहेत. त्यामुळे मुंबई पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. त्याचमुळे सभेच्या या परिसराला छावणीचे स्व्रूप आले आहे.
वांद्रे-कुर्ला संकुलाला छावणीचे स्वरूप आले आहे. तसेच संपूर्ण शहरात सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलीय. ५ स्तरांची सुरक्षा व्यवस्था असणार आहे. प्रत्यक्ष सभेच्या ठिकाणीही २ वेगवेगळ्या सिक्युरीटी चेकनंतरच सभेसाठी प्रवेश देण्यात येणार आहे.
बिहार येथील मोदीच्या सभेच्यावेळी झालेला बॉम्बस्फोेटामुळे याठिकाणी गडबड होवू नये म्हणून दखल घेतली जात आहे. त्यातच मोदींच्या या सभेवर दहशतवादी हल्ला होऊ शकतो असे गुप्तचर यंत्रणांचे रिपोर्ट्स आहेत. त्यामुळे मुंबई पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपसून सभेच्या या परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे.