सोहेल खानच्या बर्थडे पार्टीला सलमानची दांडी

अभिनेता सलमान खानचा धाकटा भाऊ आणि दिग्दर्शक सोहेल खानने नुकताच वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने सोहेलने त्याच्या बांद्रास्थित घरी एक शानदार पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत सोहेलच्या कुटुंबीयांव्यतिरिक्त बॉलिवूडमधील त्याची मित्रमंडळी सहभागी झाली होती. सर्व बॉलीवूडच्याा मंडळीने या पार्टीला हजेरी लावली असली तरी सलमान खान या पार्टीला गैरहजर असल्याडने वेगवेगळे मत व्यतक्त केले जात आहे.

योवळी बॉलिवूडमधून रितेश देशमुख, पुलकित सम्राट, अमृता अरोरा आणि तिचा पती शकील, चंकी पांडे आणि त्याची पत्नी पार्टीत सहभागी झाले आणि त्यांनी सोहेलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या सोहेलच्या पार्टीत त्यारच्याा कुटुंबातील पत्नी सीमा खान, भाऊ अरबाज खान, वडील सलीम खान, दोन्ही बहिणी अर्पिता आणि अलविरा पार्टीत दिसले.

सोहेलसाठी आगामी वर्ष खूप महत्त्वाचे ठरणार आहे. कारण पुढीलवर्षी त्याने दिग्दर्शित केलेला जय हो हा सिनेमा रिलीज होणार आहे. २४ जानेवारी २०१४ ला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे. सोहेलच्या या पार्टीला सर्व बॉलीवूडच्या मंडळीने हजेरी लावली असली तरी त्या चा मोठा भाउ सलमान खान या पार्टीला गैरहजर असल्याने वेगवेगळे मत व्यक्त केले जात आहेत. त्याच्या गैरहाजरीमुळे परत एकदा वेगवेगळया अफवा पसराविल्या जात आहेत.