नवी दिल्ली – वरिष्ठ काँग्रेस नेत्या आणि राज्यसभेच्या खासदार जयंती नटराजन यांनी केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रीपदाचा शनिवारी राजीनामा दिला आहे. आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये पक्षसंघटनेत फेरबदल करण्यात येत असल्याीचे जयंती नटराजन राजीनामा दिला असल्याचे समजते.
त्यांच्या राजीनाम्याणमुळे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री वीरप्पा मोईली यांच्याकडे पर्यावरण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. पक्षसंघटनेत काम करण्यासाठी जयंती नटराजन यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये पक्षसंघटनेत फेरबदल करण्यात येत आहेत.
अरविंदर सिंग लवली यांची दिल्ली प्रदेशाध्यक्षपदी आणि भूपेश बाघेल यांची छत्तीसगड प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नटराजन यांचा राजीनामा स्वीकारला आहे. पक्षसंघटनेत काम करण्यासाठी जयंती नटराजन यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे.राहुल गांधी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एक टीम बनवत असून, यामध्ये जयंती नटराजन यांचा समावेश करण्यात आला आहे.