नवी दिल्ली- दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून सरकार कोणचे येणार याबाबतचा पेच सुटण्याची शक्यता आहे. आगामी काळात दिल्लीत आता कॉंग्रेसच्या पाठींब्यावर दिल्लीत सरकार आम आदमी पार्टीचे स्थापन होण्याची शक्यता बळावली आहे. ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल यांनी जनतेला मत नोंदविण्या चे आवाहन केल्या नंतर आतापर्यंत ७५ टक्के लोकांनी सरकार स्थापन करण्याच्या बाजुने मत नोंदविले आहे. त्यामुळे सोमवारी अरविंद केजरीवाल सरकार स्थापन करण्याबाबत निर्णय घेऊ शकतात, अशी माहिती सुत्रांनी दिली.
याबाबत बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले, ‘आपला दिल्लीत सरकार स्थापन करुन जनतेने दिलेली आश्वासने पूर्ण करावी लागतील तसे केल्या नंतरच ‘आप’ला आगामी लोकसभा निवडणूकीत जनता स्विकारेल. सरकार स्थापनेबाबत रविवारपर्यंत वॉर्ड बैठका घेतल्यानंतरच अंतिम निर्णय घेऊ.
‘आप’चे नेते योगेंद्र यादव म्हणाले, दिल्लीत सरकार स्थापनेबाबत केंद्राने दिलेली मुदत आमचा पक्ष मान्य करणार नाही. आम्ही जनतेचे मत घेत आहोत. रविवारपर्यंत ही प्रक्रीया चालेल. सरकार स्थापन करण्यासाठी कोणी किती मुदत देत आहे, याचा यावर परिणाम होणार नाही.