बहुचर्चित ‘धूम ३’ शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. भारतात एकाचवेळी साधारण ४ हजार स्क्रीनवर ‘धूम ३’ धमाल बघायला मिळाणार आहे. तर विदेशात साधारण ७५० ठिकाणी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट जवळजवळ ४८०० स्क्रिन्सवर प्रदर्शित होणार आहे. ‘धूम ३’ ची तिकिट विक्री जोरात सुरू आहे. आयनॉक्स, पीव्हीआर, इरॉस आणि अन्य सगळ्या थेटर्समध्ये ‘धूम३’ चीच चलती आहे.
कॉलेजची मुलेही बंक मारून खास करून सिनेमा पाहण्यासाठी गेले आहेत. या सिनेमाला प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. हॉट अॅण्ड सेक्सी कैटरिनाला तरुणाईने विचारलेदेखील नाही. आमिरपुढे इतर कलाकार त्यांची जादू चालविण्यात अयशस्वी ठरले आहेत. अभिषेक बच्चन आणि उदय चोप्राने तर सरळ अभिनय क्षेत्रातून निवृत्ती घ्यावी, अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिल्या आहेत.
आमिरला वेगळ्या रुपात आणि खलनायकाच्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक तिकीटासाठी ९०० रुपये मोजण्यासाठी तयार झाले आहेत. दरम्यान, ‘धूम-३’ च्या यशासाठी अभिनेत्री कैटरिना कैफने अजमेरमध्ये ख्वाज गरीब नवाज दर्ग्यात प्रार्थना केली. धूम ३ हा चेन्नई एक्स्प्रेस आणि क्रिश ३ चा रेकॉर्ड मोडण्यात यशस्वी ठरतो का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.