
वॉशिंग्टन – भारतात दहशतवादी हल्ल्याची योजना आखत असलेल्या शीख दहशतवादी संघटनांना मदत केल्याच्या आरोपावरुन अमेरिकन तपास यंत्रणा एफबीआयने एका भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरीकाला अटक केली आहे. बलविंदर सिंग (३९) असे आरोपीचे नाव आहे. बब्बर खालसा इंटरनॅशनल आणि खलिस्तान झिंदाबाद फोर्स या दोन दहशतवादी संघटनांशी तो संबंधित होता.
