आप ला सरकार स्थापन करण्यास आणखी मुदत

नवी दिल्ली- दिल्ली सरकार स्थापन करण्याचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे केंद्र सरकराने सरकार स्थापन करण्यासाठी आम आदमी पक्षाला आणखी वेळ देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी गुरुवारी ही माहिती दिली. यासंदर्भात केंद्र सरकारने दिल्लीचे नायब राज्यपालांना आपला आणखी सरकार स्थापन करण्यासाठी आणखी किती दिवसांची मुदत देता येईल यासंदर्भात विचारणा केली होती.

नायब राज्यपाल नजीब जंग यांना आपला आणखी काही दिवसांची मुदत देण्यात यावी असे म्हटल्याचे शिंदे यांनी सांगितले. शिंदे यांच्या आजच्या वक्तव्यावरुन केंद्र सरकारला दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची घाई नसल्याचे स्पष्ट होते. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांमध्ये कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे अद्याप सरकार स्थापन झालेले नाही.

प्रथमच निवडणूक लढवणा-या ह्यआपह्णला विधानसभेच्या ७० पैकी २८ जागांवर विजय मिळवला आहे. तर काँग्रेसला आठ जागा मिळाल्या आहेत. ह्यआपह्णने दिलेल्या १८ पैकी १६ अटी मान्य करत काँग्रेने सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा दिला आहे. मात्र काँग्रेसचा पाठिंबा घेऊन सत्ता स्थापन करण्यासंदर्भात ह्यआपह्णने जनतेचा कौल घेण्याचे ठरवले आहे. यासाठी ह्यआपह्णने एक निवदने प्रसिद्ध केले असून त्याच्या २५ लाख प्रती छापल्या आहेत. सरकार स्थापन करण्यासंदर्भात आप सोमवारी निर्णय सांगणार आहे.