आगामी निवडणूकीनंतर विस्काळीत चित्र- शरद पवार

नवीदिल्ली- आगामी काळात होत असलेल्यार लोकसभा निवडणूकीनंतर चित्र विस्कळीत असेल. एप्रिल २०१४ मध्येग होत असलेल्यास लोकसभा निवडणूकीनंतर आलेले नवीन सरकार वर्ष सहा महिनेच टिकेल. वर्षभरात पुन्हा एकदा निवडणुकांची शक्यसता असेल, असे भाकित केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे आता वेगवेगळे अंदाज वर्तविले जात आहेत.

आगामी काळात होत असलेल्या निवडणूकीबाबत बोलताना पवार म्हंणाले, ‘युपीए तीनबाबतही त्यांनी साशंकता व्यक्त केली आहे. २०१४ च्यान लोकसभा निवडणूकीनंतर चित्र विस्कळीत राहणार आहे. २०१४ला निवडून आलेले सरकार वर्ष सहामहिनेच टिकणार आणि वर्षभरात पुन्हा निवडणुका होण्याची शक्यता आहे. तसेच त्यांनी युपीए तीनच्या भविष्याबाबतही साशंकता व्यक्त केली आहे.’

गुरुवारी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा केला जात आहे. या वाढदिनी असे भाकित केल्याने राजकीय वर्तुळाच उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, दिल्लीतील त्याच्या निवासस्थानी अगदी साध्या पद्धतीने त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. यावेळी दिल्लीतील अनेक जेष्ठ नेते आणि मान्यवरांनी पवारांना शुभेच्छा देण्यासाठी हजेरी लावली.