
एचसीएल पाठोपाठ आयटी क्षेत्रातील तिसरी मोठी कंपनी असलेल्या विप्रोने संगणक व सर्व्हर उत्पादन थांबविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र हा निर्णय जाहीर होताच विप्रोचा शेअर वधारला आहे.

एचसीएल पाठोपाठ आयटी क्षेत्रातील तिसरी मोठी कंपनी असलेल्या विप्रोने संगणक व सर्व्हर उत्पादन थांबविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र हा निर्णय जाहीर होताच विप्रोचा शेअर वधारला आहे.
विप्रो १९८५ पासून देशात संगणक उत्पादन क्षेत्रात आहे. उत्तराखंडातील कोटद्वार आणि पुद्दुचेरी येथे असलेल्या फॅक्टरीतून २.२० लाख संगणक, लॅपटॉप व सर्व्हर तयार केले जातात. आता हे उत्पादन बंद होणार असले तरी विप्रो हार्डवेअर उत्पादन सुरूच ठेवणार आहे. कंपनीचे उपाध्यक्ष सौमित्र घोष म्हणाले की कंपनी पूर्वी विकेलेल्या सर्व उपकरणांची वॉरंटी आणि देखभालीची जबाबदारी पूर्ण करणार आहे. मात्र यापुढे कंपनी सिस्टीम इंटिग्रेशन आणि आयटी सोल्यूशन व सेवा क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्रीत करणार आहे.
बाजारात फॅब्लेट व टॅब्लेट विक्रीत ज्या प्रकारे वाढ होते आहे ते पाहता पर्सनल संगणक उत्पादकांवर दबाव येत आहे. त्यातून रूपयातील घसरणीमुळेही उत्पादकांना नुकसान सहन करावे लागते आहे कारण संगणकाचे ९० टक्के भाग आयात करावे लागतात असे कंपनीतील वरीष्ठ अधिकारी म्हणाले. ते म्हणाले विप्रो संगणक उत्पादन बंद करणार आहे मात्र परदेशी कंपन्यांच्या संगणकांची विक्री सुरूच ठेवणार आहे.