मोदींच्या व्हिसाबाबतच्या धोरणात बदल नाही; अमेरिकेचे स्पष्टीकरण

वॉशिंग्टन – भाजपचे नेते नरेंद्र मोदी यांच्या व्हिसाबाबत अमेरिकेचे धोरण पूर्वीप्रमाणेच असून त्यात कोणताही बदल झालेला नाही, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. भारतात पुढीलवर्षी होणार्‍या निवडणुकांनतर कोणीही सत्तेवर आले तरी आम्ही भारताबरोबरचे सहकार्य कायम ठेवणार आहोत, भारताशी असलेल्या संबंधांवर त्याचा काहीहंी परिणाम होणार नाही, असे ओबामा प्रशासनातील अधिकार्‍याने स्पष्ट केले आहे.

अमेरिकेच्या दक्षिण आणि मध्य आशिया विभागाच्या साहाय्यक सेक्रेटरी निशा देसाई बिस्वाल यांनी सांगितले की, व्हिसाच्या बाबतीत आमचे धोरण स्पष्ट आहे. ज्याला अमेरिकेचा व्हिसा हवा आहे त्याने व्यक्तिशः त्यासाठी अर्ज करावा. त्याच्या अर्जाची प्रचलित पद्धतीनुसार छाननी करूनच त्याच्या अर्जावर निर्णय केला जातो. मोदी हेहंी यासाठी अर्ज करू शकतात. यावर प्रचलित पद्धतीनुसारच कार्यवाही होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

त्या म्हणाल्या की, त्यांनी अजून व्हिसासाठी अर्ज केलेला नाही त्यामुळे त्याच्यावर प्रक्रिया होऊ शकलेली नाही आणि जोपयर्ंंत प्रक्रिया सुरू होत नाहंी तोपर्यंत एखाद्याच्या व्हिसा विषयाचे काय होईल हे आताच सांगता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. व्हिसासाठी केल्या गेलेल्या अर्जाचा केस बाय केस विचार होतो आणि तो अमेरिकेच्या प्रचलित पद्धतीनुसार आणि धोरणंानुसार होतो. या धोरणांमध्ये अजून कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत, असे त्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात सांगितले.