भ्रष्टाचाराच्या जागतिक क्रमवारीत भारताचा ९४ वा क्रमांक

मुंबई : ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल नावाच्या संस्थेने जगभरातल्या भ्रष्टाचारी देशांचा सर्वे केला आहे. त्याचा अहवाल प्रकाशित करणत आला असून या ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार जागतिक भ्रष्टाचार क्रमवारीत भारताचा ९४ वा क्रमांक आहे. म्हणजे सर्वाधिक भ्रष्टाचारी असे ९३देश आपल्या आधी आहेत. त्यामुळे हा थोडासा आपल्यासाठी दिलासा देणारी बाब आहे.

या वर्षातही भ्रष्टाचारात जगातील १७७ देशांपैकी भारताचा ९४वा क्रमांक आहे. ट्रा्सपरन्सी इंटरनॅशनलने जगभरातल्या १७७ देशांचा या अहवालात समावेश करून त्यांना भ्रष्ट्राचाराची क्रमवारी दिली आहे. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या सर्वेमध्ये प्रामुख्याने सार्वजनिक किंवा सरकारी क्षेत्र किती भ्रष्ट आहे त्यावर हे रेटिंग दिले गेले आहे.

ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल ही संस्था जागतिक भ्रष्टाचार विरोधी काम करणारी संस्था दरवर्षी हा अभ्यास करते. ० ते १०० च्या स्केलमधे भारताला १०० पैकी फक्त ३६ गुण मिळाले आहेत. म्हणजे भारत काठावर आहे. म्हणजे तुम्हाला शून्य गुण असतील तुम्ही सर्वाधिक भ्रष्ट आणि तुम्हाला शंभर गुण असतील तर तुम्ही तुलनेने कमी भ्रष्ट किंवा स्वच्छ आणि पारदर्शी. या गुणपत्रिकेत भारताला मिळालेले मार्क्स आहेत. शंभर मार्कांची कमाई करायला भारताला अजून खूप काम करावं लागेल. जगातील ७५ टक्के देशांचा स्कोर ५० च्या आत आहे म्हणजेच भ्रष्टाचाराची लागण सगळीकडेच पसरली आहे.