अमेरिकेला लवकरच महिला राष्ट्राध्यक्ष मिळेल- ओबामा

वॉशिग्टन – राष्ट्राध्यक्षाचे निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसमध्ये महिला राष्ट्राध्यक्ष आलेल्या अमेरिकन नागरिकांना लवकरच पाहायला मिळतील असे बराक ओबामा यांनी एका मुलाखतीत सांगितले. मात्र या राष्ट्राध्यक्ष म्हणजे हिलरी क्लिंटन असतील काय याबाबत मात्र त्यांनी कोणताही खुलासा केला नाही. अेबीसी वाहिनीला त्यांनी दिलेल्या मुलाखतीचा कांही भाग या वाहिनीने वेबसाईटवर टाकला आहे त्यात ओबामा यांचे हे विधान दिले गेले आहे.

ओबामा म्हणतात आपल्या देशात कर्तबगार आणि केपेबल महिलांची संख्या मोठी आहे त्यामुळे महिला राष्ट्राध्यक्ष नजीकच्या काळात निवडली जाणे यात कांही गैर नाही. इतकेच काय पण अमेरिकेला पहिली महिला राष्ट्राध्यक्ष मिळाली तर ती अतिशय उत्तम तर्हे ने ही जबाबदारी पार पाडेल असा मला विश्वास आहे.

गेले कांही दिवस माजी परराष्ट्र सचिव आणि माजी फर्स्ट लेडी हिलरी क्लिंटन या २०१६ ला होणारी राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढविणार असल्याची चर्चा जोरदार असून सध्या त्या न्यूयॉर्कच्या सिनेटर आहेत. सध्या पैसे घेऊन भाषणे देणे आणि पती बिल यांनी स्थापलेल्या किलंटन फौंडेशनचे काम पाहणे या कार्यात त्या व्यग्र आहेत. मात्र विविध संस्थांतर्फे आगामी राष्ट्राध्यक्ष पदासाठी जे पोल घेतले जात आहेत तेथे हिलरी यांनी चांगली आघाडी मिळविली आहे असे समजते.